Wednesday, January 7, 2015

सावर रे मना सावर रे .. (Lyrics of 'सावर रे एकदा, सावर रे/Saavar Re Mana' From Movie Mitwaa )



सावर रे मना सावर रे


सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची..
वाट हळवी वेचताना..सावर रे मना
सावर रे सावर रे
सावर रे एकदा सावर रे

सावळ्या क्षणांचे भरून आल्या घनांचे
थेंब ओले झेलताना सावर रे मना
सावर रे सावर रे
सावर रे एकदा सावर रे

भान उरले ना जगाचे ना स्वत:चे
सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे
फितूर झाले रात दिन तू.. सावर रे
सावर रे मना सावर रे .. सावर रे
सावर रे एकदा सावर रे

मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायर्‍या थोड्या सुखाच्या अन् अबोली अंतरे
येतील आता आपले ऋतू
बघ स्वप्न हेच खरे

पालवीच्या सणांचे.. दिवस हे चांदण्यांचे..
पानगळ ही सोसताना .. सावर रे मना ..
सावर रे .. सावर रे ..
सावर रे एकदा सावर रे .

स्पर्श होता आत.. लाखो आर्जवांची झुंबरे
स्वप्न हे माझे तुझे अन् पापण्यांचे झुंबरे
जाईल आता आस ही उतू
बघ रात ही सरे
पावसाच्या फुलांचे.. दिवस हे पैंजणांचे
मी हवेतून चालतांना ..
सावर रे मना ..
सावर रे .. सावर रे ..
सावर रे एकदा सावर रे .

No comments:

Post a Comment